अवैध वाळू तस्करांकडून अप्पर तहसीलदारांना धक्काबुक्की

अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांची मुजोरी
अवैध वाळू तस्करांकडून अप्पर तहसीलदारांना धक्काबुक्की

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

मालपूर ता. शिंदखेडा शिवारात नदी पात्रात अवैधपणे वाळू उपसा होत असल्याची माहिती अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना मिळाली.

याबाबत कारवाई करीत असतांना ट्रॅक्टर मालकाकडून अप्पर तहसीलदार सुदाम महाजन व त्यांच्या सहकार्‍यांना धक्काबुक्की करण्यात आली असल्याची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली आहे.

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन ट्रॅक्टर मालकांविरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात धक्काबुक्की करणारे संशयीत प्रविण उर्फ सोन्या प्रकाश देवरे, अनिल भिमराव देवरे रा.कर्ले ता. शिंदखेडा या दोन जणांविरुद्ध भादंवि 353, 379, 332, 341, 143, 147, 323, 504, 506, 188, 269, 270, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 प्रमाणे, 37 1.3. चे उल्लंघन, साथ रोग कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मालपूर शिवारात नाय नदीपात्रात अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे समजल्यावर खाजगी दुचाकीवरून वेशभूषा बदलून चालक युवराज माळी सोबत घटनास्थळी पोहचलो असता या नदी पात्रात निळ्या व लाल रंगाचे दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अवैध वाळू असल्याचे दिसले.

त्यांच्याकडे वाळू वाहतूक परवाना व कागदपत्राबाबत चौकशी केली, मात्र परवाना आढळून आला नाही.

त्यावेळी ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता दोंडाईचा पोलीस ठाण्यात येण्यास सांगण्यात आले.

याचा राग येवून त्यांनी आपणास व आपल्या सहकार्‍यास धक्काबुक्की केल्याचे श्री.महाजन यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com