दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

शहरातील शाहबाज खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एकाला अटक केली आहे. भुषण पारधी (रा. दोंडाईचा) असेे त्याचे नाव आहे.

काल सकाळी त्याला राहत्या घरून अटक करण्यात आली. दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

येथील उपजिल्हा रूग्णालयात दि. 1 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास जमावाने हल्ला करत शाहबाज शाह गुलाब शाह (रा. गरिब नवाज कॉलनी, दोंडाईचा) याचा खून केला.

याप्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांपुर्वी दोन जणांना अटक केली आहे. आता आणखी एकाला अटक केल्याचे संशयीत आरोपींची संख्या तीन झाली आहे. तिघे पोलिस कोठडीत आहेत.