दोंडाईचात अपर तहसीलदारांची धडक कारवाई

सिंधी कॉलनीत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त
दोंडाईचात अपर तहसीलदारांची धडक कारवाई

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

शहरासह परिसरात अवैधपणे वाळू उपसा व वाहतूक करणार्‍यांवर अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी धडक कारवाई सुरू केली आहे.

आज दि. 3 रोजी सकाळी सिंधी कॉलनीत अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला (क्र. एमएच 19 सी 4395) पकडण्यात आले.

ट्रॅक्टर चालकाची चौकशी केली असता त्याने आजिमखान सबीबखान बेलदार असे ट्रॅक्टर मालकाचे नाव सांगितले.

त्याच्याकडे कुठलाही परवाना मिळून आला नाही. त्यामुळे महसूल विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर जप्त केले.

ही कारवाई अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, मंडळाधिकारी पंडित दावळे, तलाठी संजीव गोसावी आदींनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com