दोंडाईच्यात कार चोरणारी टोळीला नागरिकांचा चोप

तिघे फरार होण्यास यशस्वी, चोरट्यांना केले पोलिसांच्या स्वाधीन
दोंडाईच्यात कार चोरणारी टोळीला नागरिकांचा चोप

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

शहरात बनावट चावीचा वापर करून कार चोरून नेणार्‍या टोळीतील तिघांना नागरिकांनी रंगेहाथ पकडले. तर त्यांचे तिघे साथीदार हातून निसटले.

तिघांना चोप देत नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधिन केले. याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बलदेवसिंग पदमसिंग राजपूत (वय 28 रा. हरचंद नगर दोंडाईचा) पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार काल दि. 27 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास त्यांची घराबाहेर उभी कार (क्र. जी. जे. 15 सी.एफ. 6697) घराच्या अंगणात लावलेली होती.

रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एका गाडीतून (क्र. एम.एच 02 ई. के. 2195) अज्ञात पाच ते सहा इसम आले. त्यांनी बनावट चावीच्या सहाय्याने कार चोरी करून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राजपूत यांच्या लक्षात आले.

त्यांनी आरडाओरड करतात जवळील काही लोक धावून आले. त्यांनी तीन जणांना पकडले. तर तीन जण पसार झाले. तिघांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

लक्ष्मण ईश्वर ठाकरे (रा. धुरुभाईवाडी ता. जि. नवसारी (गुजरात), प्रविण संजयसिंग गिरासे व ज्ञानेश्वर आनंदसिंग गिरासे (रा. आरावे ता. शिंदखेडा) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी पळुन गेलेल्या तिघा साथीदारांची नावे सांगितली. भगतसिंग उर्फ भानू इंद्रसिंग गिरासे (रा. अंबाजी नगर विजलपुर ता. जि. नवसारी (गुजरात), बाबु (पूर्ण नाव माहीत नाही) रा. डी. डी. गर्स स्कुल जवळ, नवसारी व प्रकाश गिरासे (रा. सहयोग सोसायटी, विजलपूर ता. जि. नवसारी) अशी तिघांंची नाव आहेत.

या सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास हवालदार उमेश चव्हाण करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com