अप्पर तहसीलदारांसह पथकाला धक्काबुक्की

दाऊळ शिवारातील घटना, आठ जणांवर गुन्हा
अप्पर तहसीलदारांसह पथकाला धक्काबुक्की

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ शिवारात अमरावती नदी पात्रात स्मशानभूमी लगत अवैधपणे मुरूम उपसा करणार्‍यांवर कारवाईसाठी गेलेल्या अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्याासह पथकाला धक्काबुक्की करण्यात आली. काल सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अवैधपणे मुरूम उपसा करणार्‍या जेसीबी व ट्रॅक्टर मालकाकडून अप्पर तहसीलदार सुदाम महाजन व त्यांच्या सहकार्‍यांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला.

याप्रकरणी अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्या फिर्यादीवरून हरपला भोजुसिंग गिरासे (वय 33 रा. वणी ता. शिंदखेडा), जेसीबी मालक अलंकार अशोक भामरे (वय 50 वर्षे रा. दाऊळ ता. शिंदखेडा), राजेंद्र जामसिंग गिरासे (रा. वणी ता. शिंदखेडा), जेसीबी चालक व दोन्ही ट्रॅक्टर चालक व इतर अनोळखी तीन चार इसम अशा आठ ते दहा जणांविरोधात दोंडाईचा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com