भाजपने गोटे यांच्या प्रतिमेला जोडे मारून केला निषेध

हजारो कार्यकर्त्यांची गढीवर गर्दी
भाजपने गोटे यांच्या प्रतिमेला जोडे मारून केला निषेध

दोंडाईचा । प्रतिनिधी Dondaicha

माजीमंत्री तथा भाजपाचे जयकुमार रावळ यांच्या टाकरखेडा येथील फार्महाऊसमध्ये बेकायदा घुसून धिंगाणा घातल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज गोटे हे एक हजार कार्यकर्त्यांना घेऊन दोंडाईचा पोलिसात हजरहोण्यासाठी येणार असल्याचे बघून भाजपणेही हजारो कार्यकर्ते जमवून त्यांचा निषेध केला.

यावेळी गोटे यांच्या प्रतिमेला जोडेही मारण्यात आले.भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. आम्हीही दोन हजार कार्यकर्ते घेऊन कारवाईची मागणी करू, असा इशारा भाजपणेही दिला होता. मात्र पोलीस प्रशासनाने दोन्ही गटांना नोटीस बजावून गर्दी न करण्याची तंबी दिली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com