दोंडाईचा : बांधांवर गवत टाकले म्हणून दोघांना बेदम मारहाण
धुळे

दोंडाईचा : बांधांवर गवत टाकले म्हणून दोघांना बेदम मारहाण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

दोंडाईचा - शेतांच्या बांधांवर गवत टाकले म्हणून दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील चवळदे शिवारातील घडली. याप्रकरणी आठ जणांविरूध्द दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत दिपाली दिपक धनगर (वय 19) यांनी दोंडाईचा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्र बागल यांची शेती राकेश साहेबराव धनगर यांनी निमबटाईने शेती करण्यासाठी घेतली आहे. त्या शेताला लागुन निमगुळचे सुभाष जैन यांची शेती आहे. ती शेती निमगुळचे शाम शिवदास बागुल हे निमबटाईने करतात. दोघांचे शेतीचे बांध एकत्र आहे.

त्याठिकाणी दि. 16 रोजी राकेश धनगर व समाधान धनगर हे दोन्ही भाऊ आपल्या आई, वडील व पत्नीसह शेतात गवताची निंदणी करत होते. ते गवत जवळच्या बांधांवर टाकत होते. म्हणून शेजारी असलेले शाम शिवदास बागल यांनी याठिकाणी गवत का टाकतात, असे बोलून वाद घातला. तसेच शिवीगाळ करत मारहाण केली. फोन करून गावातील छोटु बागल, मुन्ना अभिमन भदाणे, नितीन छोटु बागल, विनोद शाम बागल यांना बोलाऊन घेतले. त्यांनीही लाठ्या काठ्या व लोखंडी पाईपने राकेश साहेबराव धनगर याला बेदम मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध पडला. त्याला नातेवाईकांनी धुळे येथील जवाहर फाऊंन्डेशनच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असुन उपचार सुरू आहे.

याप्रकरणी शाम बागल, छोटु बागल, मुन्ना अभिमन भदाणे, नितीन छोटु बागल, विनोद शाम बागल व इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक देविदास पाटील करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com