ट्रकची दुचाकीला धडक,पती ठार,पत्नी गंभीर

दोंडाईच्यातील नंदुरबार चौफुलीवरील घटना, ट्रक चालकाला पकडले
ट्रकची दुचाकीला धडक,पती ठार,पत्नी गंभीर

दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

शहरातील नंदुरबार चौफुलीवर भरधाव ट्रकने पुढे चालणार्‍या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात पती ठार जागीच ठार झाला. पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

आज सायंकाळी हा अपघात झाला. दरम्यान नागरिकांनी पळुन जाणार्‍या ट्रक चालका पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

शहादाहून दोंडाईचाकडे जाणार्‍या ट्रकने( क्र. जी. जे. 21 डब्ल्यू 9253) पुढे चालणार्‍या दुचाकीला (क्र. जी जे 5 एफ जे 1347) नंदुरबार चौफुली जवळ गतिरोधकावरच जोरदार धडक दिली.

त्यात दुचाकीस्वार जफार गुलाब बागवान (वय 50 रा. गरीब नवाज कॉलनी, शहादा) यांच्या डोक्याला मार बसल्याने ते जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी सायरा जफार बागवान (वय 30) या गंभीर जखमी झाल्या.

त्यांना धुळे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

ट्रक चालक पळून जात असतांना नागरिकांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे बोलले जात होते. मोहम्मद अब्दुल लतीफ (रा. उत्तर प्रदेश) असे ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com