आदिवासी भागात जिल्हाधिकार्‍यांनी साधला मजुरांशी संवाद

आदिवासी भागात जिल्हाधिकार्‍यांनी साधला मजुरांशी संवाद

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

तालुक्यातील आदिवासी भागात दौरा करुन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी मजुरांशी सुसंवाद साधला.

करोनाच्या प्राश्वभूमीवर जिल्हाधिकारी संजय यादव यांचा ग्रामीण भागात विशेषतः आदिवासी भागात आज दौरा झाला. त्यांनी हाडाखेड येथील सब सेंटर असलेल्या आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्रात भेट देऊन पाहणी केली.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी येथे भेट देऊन वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा करुन नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी सांगवी गावातील पाणी टंचाईबाबत ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

त्यादरम्यान दुर्बड्या येथील वन विभाग सांगवी प्रादेशिक मंग्रारोहयो अंतर्गत सुरू असलेले सिसीटी समतलचर केलेल्या कामाची पाहणी करून व उपस्थित एमआरईजीएसच्या मजुरांशी चर्चेद्वारे संवाद साधला. मजुरांना वेळेवर रेशन धान्य मिळाले किंवा नाही या सर्व विषयावर मजुरांची चौकशी करून तसेच मजूरांना वेळेवर मजुरी बँकेत जमा केला जाईल या संदर्भात चर्चा झाली.

जिल्हाधिकारी यांनी वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून लस ठेवण्याचे फ्रीजिंगची पाहणी केली. या दरम्यान बालमृत्यू बाबत वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, गटविकास अधिकारी यांच्याशी बालमृत्यू बाबत मागील काळात काय झाले. त्या कारणांची मिमांसा करून अहवाल सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले. अंगणवाडी केंद्र व वकवाड येथील केंद्रास भेट देऊन अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बाल विकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी यांना 0 ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना, गरोदर स्त्रिया, स्तनदा मातांना अमृत आहारामध्ये अंडी, केळी, सकस आहार देण्याबाबतचा नमुना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. गरोदर स्तनदा महिलांना लसीकरण देण्याबाबत आरोग्य तपासणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच वकवाड ग्रामपंचायत अंतर्गत शबरी घरकुल योजना तसेच प्रधानमंत्री घरकुल यांची पाहणी करून लोकांना आश्वासित करण्यात आले.

गुर्‍हाळपाणी येथे डिलिव्हरी रूम तयार करून वैद्यकीय कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात आली. तसेच गुर्‍हाळपाणी येथे एकूण 25 महिलांची डिलिव्हरी करण्यात आली. यादरम्यान पाहणी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी तसेच लुपिन फाउंडेशनच्या वतीने गुर्‍हाळपाणी येथे अद्ययावत डिलिव्हरी रूमचे बांधकाम करून देण्याची तयारी दाखवली. सामाजिक बांधिलकी जपत 10 लाख रुपये पर्यंतचा खर्च करायची तयारी लुपिन फाउंडेशनने दाखवली. अंगणवाडी केंद्राची पाहणी करून गरोदर, स्तनदा मातांना आहाराचे वाटप करण्यात आले. येथे या फाउंडेशनमार्फत गरजू लोक कुटुंबांना धान्य वाटप, कडधान्य वाटप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. आज या दरम्यान जिल्हाधिकारी यांनी विविध प्रशासकीय कामांचा आढावा घेऊन अधिकार्‍यांशी चर्चा केली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी संजय यादव, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, रोजगार हमी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा आरोग्य अधिकारी नवले, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंग बांदल, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर युवराज शिंदे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, वनक्षेत्रपाल आनंद मेश्राम, वनपाल विलास बारी, विस्तार अधिकारी आर.जी.पावरा, एमआरजीएस मदन देवरे, रोजगार हमी समन्वयक शशिकांत कुमावत, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनार, प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन पवार, अंगणवाडी सेविका गूरीबाई पावरा, अंगणवाडी पर्यवेक्षिका रंजना पावरा, संगीता तोरणे, ग्रामपंचायत सदस्य राजू पावरा, ग्रामविकास अधिकारी तिरमले, काशिराम पावरा आदी उपस्थित होते

दुर्बळया येथील समतल चर कामाची देखील पाहणी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केली व मजुरांशी सुसंवाद साधला. मजुरांच्या समस्या जाणून घेतल्या, मजुरी वेळेवर मिळते का ? यावेळी त्यांनी मस्टर तपासणी केली. कोरोना व लसीकरण माहिती जाणून घेतली. यावेळी सर्व अधिकारी, शिरपूर सबडीविजन एस. ई. एफ. अमितराज जाधव, वनक्षेत्रपाल आनंद मेश्राम, ग्रामसेवक संतोष कुंवर, रोजगार सेवक भरत पावरा, वनरक्षक तापीराम पावरा व स्वामी विवेकानंद रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन अध्यक्ष विनोद माळी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com