कृषी सहाय्यकाच्या साक्षीने शेतकऱ्यांना खताचे वाटप
धुळे

कृषी सहाय्यकाच्या साक्षीने शेतकऱ्यांना खताचे वाटप

खत विक्रेत्या एजन्सीचा आदर्श उपक्रम

Rajendra Patil

समाधान ठाकरे

दोंडाईचा - Dondaicha

येथे व परिसरात दोन दिवसापासून दमदार पाऊस बरसल्याने खताचा तुटवडा भासत होता. मात्र शहरातील एका खत विक्रेत्या एजन्सीने कृषी साहय्यक यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना सोशल डिस्टनची नियम पाळत टोकन पध्दतीने खत वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.

काल दोंडाईचा येथे रॅक लागला असल्याचे लक्षात आल्याने लागलीच खतात साठा करण्यास सुरूवात करत जिल्हा कृषी अधिक्षकांच्या दिलेल्या मौखिक आदेशानुसार कृषी साहय्यक दिलीप भोई, एस.जी. पाटील यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना टोकन पध्दतीने खताचे वाटप करण्यात आले.

शहरासह ग्रामीण भागात दिवसागणिक कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाचा शिरकाव होत आहे म्हणून सर्वांनी सोशल डिस्टनची व फिजिकल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. ज्या ग्राहकाने मास्क लावलेले नाही त्यांना खत दिले जाणार तुम्ही देखील आरोग्याची काळजी घ्या व आमचा देखील जिव धोक्यात आणू नका असे कळकळीचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले.

यावेळी कृषी साहय्यक दिलीप भोई म्हणाले की, खताचा साठा उपलब्ध आहे म्हणून काळजी करण्याची गरज नाही. सर्वांना खत मिळेल आपण खत विक्रत्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे

शहरातील उर्वरित खत डिस्ट्रीब्यूटरांनी देखील टोकन पध्दतीने खत वाटप करावे. यापुढे खतांचा आलेला साठ्याचे भाव फलक आपल्या दुकानासमोर लावण्याचे निर्देश दिलेले असतांना देखील काही खत विक्रत्यांमध्ये उदासीन दिसून येत आहे. खत खरेदीसाठी उसळलेली गर्दीची परस्थिती बघता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये.म्हणून पोलीस कर्मचारी चंद्रात्रे यांनी बंदोबस्त ठेवला.

Deshdoot
www.deshdoot.com