वाघाडी - Waghadi - वार्ताहर :

शिरपुर तालुक्यातील गधडदेव येथील रहिवासी व वाघाडी येथे सध्या वास्तव्याला असलेल्या 50 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

सोमनाथ ओंकार कोळी (50) रा.वाघाडी असे मयताचे नाव आहे. त्याने राहत्या घरात कोणीही नसतांना घराच्या छताला लोखंडी पाईपला दोरी बांधून आत्महत्या केली.

त्यानंतर मयताची पत्नी सायंकाळी कामावरून घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली. मयताचा भाऊ बुधा ओंकार कोळी यांनी मृतदेह शिरपुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला तेथे डॉ.अहिरे यांनी तपासून सोमनाथ कोळीला मृत घोषीत केले.

याप्रकरणी शिरपुर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ सत्तेसा हे करीत आहेत.

दरम्यान मयत सोमनाथ कोळी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावाई, सून, नातवंडे असा परिवार आहे. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मयत कोळी हा लाकूडतोडीचा व्यवसाय करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.