धुळे

धुळ्यात वैभवनगरातील फ्लॅट सील

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

मार्च एन्डीग अवघ्या 26 दिवसांवर येवूनही मालमत्ता कर वसूल होत नसल्यामुळे महापालिका प्रशासनाने थकीतकर वसुलीसाठी भरारी पथकांची नियुक्ती केली असून हे पथके सतर्क झाले आहेत. आज जप्ती पथकाने शहरातील वैभवनगरात 78 हजार 520 रुपये मालमत्ता कर थकीत असल्यामुळे फ्लॅट सील केला. तर दोन लाख 39 हजारांचा थकीत कर वसुली केला.

महापालिका प्रशासनाने मालमत्ता धारकांना सुचनापत्र दिले आहेत. परंतु काही मालमत्ताधारकांनी कराची रक्कम भरलेली नाही. थकीत करधारकांना वेळोवेळी सुचनाही दिल्या. तसेच नोटीसाही बजावल्या आहेत. परंतु तरीही कर भरलेला नाही.

त्यामुळे कर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने भरारी पथके नियुक्त केली आहेत. या पथकांना थकीत मालमत्ताधारकांची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार पथके कारवाई करीत आहेत.

जप्ती पथकाने आज शहरातील जमनागिरीरोडवरील वैभवनगरात औंदूबर अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या लतिका आत्माराम सोनार यांच्याकडे 78 हजार 520 रुपये

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com