धुळे : विनाकरण फिरणाऱ्यांवर होतेय कडक कारवाई

पोलीसांची फौज रस्त्यावर, अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन
धुळे : विनाकरण फिरणाऱ्यांवर होतेय कडक कारवाई

धुळे | प्रतिनिधी Dhule

कोरोनाची साखळी तोडण्यासह शहरातील नागरिकांची वर्दळ कमी करण्यासाठी शहरातील पुल सार्वजनिक वापराकरीता बंद करण्यात आले. तरीही लोक इतर रस्त्यानी शहरात ये-जा करीत असल्यामुळे आज पोलिसांनी सकाळपासूनच देवपूरातील सावरकर पुतळा व आग्रा रोडसह साक्री रोड नागरिकांची कसुन तपासणी केली.

त्यात विनाकारण फिरणार्‍यांना रोखत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून त्यांचे चित्रीकरणही करण्यात आले. त्यामुळे पोलिसांना पाहुन अनेकांनी लांबूनच युर्टन घेतला.

सावरक पुतळा चौकात देवपूर पोलिस ठाण्याचे सपोनि चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक मनोज कुवर यांच्यासह पथकाने कारवाई केली. तर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह कर्मचार्‍यांनी आग्रा रोड, साक्री रोडवर तपासणीनी मोहिम राबविली. दरम्यान मोठा पुल बॅरीकेटींग करून बंद करण्यात आला आहे. तर केवळ सावरकर पुतळ्याजवळील लहान पुलावरून अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com