लक्झरीतून महिलांकडून गांजाची तस्करी
धुळे

लक्झरीतून महिलांकडून गांजाची तस्करी

Balvant Gaikwad

मुंबई- आग्रा महामार्गावरील हाडाखेड गाव शिवारात शिरपूर तालुका पोलिसांनी सापळा रचून लक्झरी बसमधून गांजाची तस्करी करणार्‍या तीन महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून प्रवासी बँगेतील दोन लाख 51 हजार 360 रूपये किंमतीचा 31 किलो सुका गांजा जप्त करण्यात आला आहे.

आज पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तिघा महिलांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिककडून राजस्थान येथे जाणार्‍या लक्झरी बसमधून काही महिला गांजाची तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्यासह पथकाने हाडाखेड गाव शिवारातील विनायक हॉटेलजवळ सापळा लावून पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास एका लक्झरी बसची (क्र. आर जे.30 पी.बी.0999) तपासणी केली. बसमध्ये प्रवास करणार्‍या पैकी संशयित यमुना शरीफ अंभगे (वय 25), रा.महाराणा चौक, कंजरवाडा नंदुरबार, कोमल दीपक गागडे (वय22) रा.महाराणा चौक, कंजरवाडा नंदुरबार ह.मु. पोपटी कॉलनी सिध्दार्थ नगर, ठाणे (ई) व कुलता संजय बाडुंगे वय 28 रा.महाराणा चौक, कंजरवाडा नंदुरबार यांच्याकडे असलेल्या बॅगमधुन प्रत्येकी सुमारे दहा किलो सुका गांजा आढळुन आला.

तिघा महिलांकडुन दोन लाख 51 हजार 360 रूपये किंमतीचे प्रत्येकी 2 बंडल या प्रमाणे 31 किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थ तीन बॅगमध्ये आढळून आला. या संदर्भात तिघा महिलांना ताब्यात घेतले. त्याच्या विरुध्द पोहेकॉ कैलास पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोसई दीपक वारे हे करीत आहेत.

पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधिक्षक राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सपोनि अभिषेक पाटील, असई नियाज शेख, पोहेकॉ कैलास पाटील, संजय देवरे, पोना संजीव जाधव पोकॉ आरीफ पठाण, राजीव गिते, अश्विनी चौधरी व सुनिता पवार यांनी केली.आले होते. खात्यावरील केवायसीचा तपास केला असता, खातेदार म्हणून कृष्णकुमार यादव असे नाव दिसल्याने तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने व सायबर सेल नंदुरबार यांच्या मदतीने उत्तर प्रदेशात गेलेल्या पोलीस पथकाने (जुडुपुर, जि.सुलतानपूर उत्तर प्रदेश) या ठिकाणी सापळा रचून कृष्णकुमार यादव (रा. सुलतानपूर ,उत्तर प्रदेश) यास अटक करून शहादा येथे आणण्यात आले. दरम्यान, शहादा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांचीची पोलीस कोठडी दिली असून अधिक तपास चालू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com