धुळ्यात धुमश्चक्री, एक जण ठार
धुळे

धुळ्यात धुमश्चक्री, एक जण ठार

तीक्ष्ण हत्याराचा वापर

Rajendra Patil

धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गावरील लळींग टोल नाक्याजवळील मोहाडी पोलीस ठाण्याच्या जवळचं हाकेच्या अंतरावरती एका हॉटेलवर दोन गटात धुमश्चक्री उडाली. लाठ्या काठ्यांसह तलवारी व हत्यारांचा वापर झाला. यात एक जण ठार झाला. तर गावठी कट्ट्यातून गोळीबारही करण्यात आला.

आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोन गट एकमेकांवर हत्यार घेऊन चालून आले. पूर्व वैमनश्यातून झालेल्या या वादामुळे मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यात एक तरुण ठार असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पथक व मोहाडी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ठार झालेल्या तरुणाच्या पार्थिवास सध्या शवविच्छेदन साठी पाठवण्यात आले असून हल्ला कोणी व कशासाठी केला याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

परंतु या गॅंगवार मुळे पुन्हा एकदा धुळ्यामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com