धुळे पोलीस अधीक्षकांची बदली
धुळे

धुळे पोलीस अधीक्षकांची बदली

Balvant Gaikwad

धुळे जिल्हा पोलीस प्रमुख विश्वास पांढरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर नागपूर शहर पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्‍यांच्या बदल्यांना प्रारंभ झाला असून यातूनच श्री. पांढरे यांची बदली झाल्याचे सांगितले जात आहे.

श्री. पांढरे यांना धुळ्यात अधिक्षक पदाची धूरा घेवून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला होता. मात्र सरकारी नियमानुसार किमान तीन वर्षांचा कालावधी बदलीसाठी ग्राह्य असतांना श्री. पांढरे यांच्या बदली होण्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती.

या चर्चेला राजकीय हस्तक्षेपाची किनार असल्याचेही बोलले जात होते. त्यामुळे या प्रशासकीय बदल्या असल्या तरीही यात ‘राजकारण’ शिजल्याचे दबक्या आवाजात बोलले जाते आहे. श्री. पांढरे यांची बदली झाली असली तरी त्यांच्या नियुक्तीबाबत स्वतंत्र आदेश पारित केला जाईल. असे आदेशात म्हटले आहे.

धुळे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून नागपूर शहर उपायुक्त चिन्मय पंडीत यांची नियुक्ती झाली असून त्यांनी पदभार घेवून तसा अहवाल सादर करावा असे गृहविभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com