Sanjay Yadav
Sanjay Yadav
धुळे

धुळे : जिल्ह्यांतर्गत बससेवेला वाहतुकीस परवानगी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - मिशन बिगेनमध्ये जिल्हांतर्गत बससेवेला 50 टक्के प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्यात आली असून तथापि, आंतरजिल्हा वाहतुकीस प्रतिबंध आहे असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका हद्दीतील इतर सर्व दुकाने, आस्थापना सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर असणे गरजेचे आहे. आस्थापना, दुकानात पाच पेक्षा अधिक लोक नकोत. असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

दि.1 ते 31 जुलैपर्यंत रुग्णालये, औषधे विक्रीची दुकाने, किराणा, फळे-भाजीपाला, कृषी विषयक सर्व प्रकारच्या आस्थापना, अतितातडीचे शासकीय कर्तव्यावरील असलेले अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा व कायदा व सुव्यवस्था हाताळणारी यंत्रणा, बँकिंग यंत्रणा, पेट्रोलपंप, महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरविणारे अधिकारी, कर्मचारी, दूध विक्रेते व सर्व पेट्रोलियम पदार्थ सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत वेळ निश्चित करण्यात आली आहे.

कन्टेन्मेन्ट क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील व्यापारी पेठातील सर्व दुकाने व विक्री करणार्‍या आस्थापना राज्य शासनाच्या आदेशातील तरतुदींचे तंतोतंत व काटेकोरपणे पालन करावे अशीही सुचना त्यांनी केली आहे.

हॉटेल खानावळीतून घरपोच सेवेला परवानगी असून तीनचाकी व चारचाकी (टॅक्सी, कॅब, ग्रीगेटर, रिक्षा) वाहनांसाठी 1+2 व्यक्ती व दुचाकी वाहनांसाठी फक्त वाहनचालकांना अत्यावश्यक सेवेसाठीच परवानगी आहे. मॉल्स व व्यापारी संकुला व्यतिरिक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांची सर्व दुकाने, आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहतील. तसेच जिल्ह्यातील सर्व सलून, स्पा सेंटर, ब्यूटी पार्लर, बार्बर शॉपची आस्थापना किंवा दुकाने ही सकाळी 7 ते 5 या कालावधीत अटी व शर्तींसह सुरु ठेवता येतील.

सद्य:स्थितीत सुरु असलेले उद्योग सुरुच राहतील. सर्व बांधकाम ठिकाणे व मान्सूनपूर्व सर्व कामे (सार्वजनिक किंवा खासगी) ही सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकारचे हॉटेल, बार (घरपोच सेवा वगळून), सिनेमागृहे, मॉल, व्यापारी संकुल, क्रीडा संकुले स्वीमिंग पूल, सभागृहे, व्यायामशाळा, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संकुल, प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवण्या, रेस्टॉरंट बार, सामाजिक, राजकीय कार्यक्रम व इतर आदरातिथ्य सेवा बंद ठेवण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत व भविष्यात कोवीड-19 प्रतिबंधीत क्षेत्र घोषित झालेल्या क्षेत्रास लागू राहणार नाही.

Deshdoot
www.deshdoot.com