धुळे

धुळ्यात शिशुगृहातील बालिकेचा मृत्यू

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

शहरातील शिशु गृहातील एका बालिकेचा आज मृत्यू झाला. आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. पाच दिवसांपुर्वीच एका बालकाचा मृत्यू झाला होता. याबाबत शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

शिशु गृहातील नक्षत्रा असे नाव असलेल्या आठ महिन्यांच्या बालिकेची दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी अचानक प्रकृती बिघडली. तिला जुलाब व उलट्यांचा त्रास होवू लागल्याने संस्थेच्या काळजी वाहक जयश्री गोपीचंद शिरसाठ व रत्ना संजय गांगुर्डे यांनी तिला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. उपचार सुरू असतांना बालिकेचा आज दि. 20 रोजी सकाळी मृत्यू झाला.

डॉ. सिध्दार्थ पाटील यांनी तपासणी करून बालिकेला मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान पाच दिवसांपुर्वी दि. 16 रोजी देखील बाल गृहातील अनुराग नावाच्या सहा महिन्याच्या बालकाचा देखील जुलाब व उलटीच्या त्रासाने उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Deshdoot
www.deshdoot.com