धुळे : नवीन ६६ करोना पॉझिटिव्ह
धुळे

धुळे : नवीन ६६ करोना पॉझिटिव्ह

चार जणांचा मृत्यू

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule :

जिल्ह्यात आज एकाच दिवशी चार जणांचा कोरोना मृत्यू झाला आहे. तर नवीन 66 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे. कोरोना बाधितांची संख्या 2 हजार 766 एवढी झाली आहे. तर 1 हजार 774 रूग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत.

दुपारी साडेचार वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल लामकानी (ता.धुळे) येथील 62 वर्षीय पुरुष, जुने धुळे येथील 52 वर्षीय पुरुष, वेल्हाणेे (ता.धुळे) येथील 70 वर्षीय पुरुष तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल वाटोदा (ता. शिरपूर) येथील 80 वर्षीय वृध्द या करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हात आतापर्यंत एकूण शंभर जणांचा कोरोने बळी घेतला आहे.

रात्री आठ वाजता जिल्हा रुग्णालयातील 179 अहवालांपैकी 25 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्या मोराणे 4, बोरकुंड 1, मांडळ 1, नरव्हाळ 1, सोनेवाडी 1, बाभुळवाडी 2, मुकटी 2, नकाने 4, फागणे 1, गरताड 1, यशवंत नगर 1, देशमुखवाडा 1, कापडणे 4 व चितोड येथील एका रूग्णांचा समावेश आहे.

तसेच मनपाच्या पॉलिटेक्निक सीसीसी केंद्रातील 43 अहवालांपैकी वलवाडी व वानखेडकर नगरातील प्रत्येकी एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा एकूण रूग्ण संख्या 2 हजार 727 वर पोहोचली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com