धुळे महापालिकेच्या महासभेत कचर्‍याचा प्रश्‍न गाजला

धुळे महापालिकेच्या महासभेत कचर्‍याचा प्रश्‍न गाजला

पाच दिवसांत नव्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर द्या - प्रभारी महापौर भगवान गवळी

धुळे Dhule| प्रतिनिधी

शहरातील कचरा संकलनाचा Garbage collection प्रश्‍न गंभीर झाला आहे. घंटागाड्या येत नसल्याने कचरा तसाच पडून राहतो. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. यामुळे महासभेत विरोधी पक्षनेत्यांसह विरोधकांनी धुळे शहर कचरामुक्त करा? असे बॅनर Banner झळकविले. थेट सभागृहात कचरा टाकल्यामुळे Garbage in the hall सत्ताधार्‍यांना कोंडीत टाकले. यामुळे सत्ताधारी संतप्त होवून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात खडाजंगी The rift between the opposition and the ruling party झाली. तसेच भाजपाचे नगरसेवक हिरामण गवळी BJP corporator Hiraman Gawli यांनी थेट आमदारांवर आरोप केला.

प्रभारी महापौर भगवान गवळी यांनी हस्तक्षेप करुन शहरातील कचरा संकलनाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी तात्काळ नवीन ठेकेदार नेमण्यासाठी निविदा प्रक्रियेनुसार मंजूरी दिलेल्या ठेकेदाराला पाच दिवसात वर्क ऑर्डर द्यावी. असे आदेश त्यांनी दिले.

महापालिकेची सभा प्रभारी महापौर भगवान गवळी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते कमलेश देवरे, उमेर अन्सारी, साबीर शेख, अमिन पटेल व एमआयएमच्या नगरसेवकांनी शहर कचरामुक्त करा, असा फलक झळकविला व सोबत एका खोक्यात आणलेला कचरा घेवून सभागृहात प्रवेश केला.

थेट महापौरांच्या आसनासमोर येवून विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करुन खोक्यातील कचरा फेकला. यामुळे भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाले. शीतल नवले, हिरामण गवळी, प्रतिभा चौधरी, कल्याणी अंपळकर यांचा विरोधी सदस्यांशी वाद झाला.

शीतल नवले, उमेर अन्सारी, संजय भील यांनी देखील कचरा प्रश्‍न मांडला. कचरा प्रश्‍नामुळे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आलेत.

महासभेच्या अजेंड्यावर मागील सभेचे इतीवृत्त नसल्याने ही सभा बेकायदेशीर असल्याचे सांगत नगरसेवक हर्षकुमार रेलन व काही नगरसेवक सभेला अनुपस्थित राहीले. मात्र ही सभा कायदेशीर असल्याचे प्रभारी नगरसचिव मनोज वाघ यांनी सांगितले.

प्रशासनाचा नाकर्तेपणा

शहरात ठिकठिकाणी कचरा साचला आहे. नवीन ठेकेदाराला कार्यादेश का? दिला जात नाही. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शहरात अस्वच्छता पसरली आहे. विविध साथीचे आजार होत आहेत. असे कमलेश देवरे यांनी सांगितले.

हिरामण गवळींचा आमदारांवर आरोप

नवीन कचरा संकलनाचा ठेका देण्याची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. मात्र शहराच्या आमदारांनी सरकारकडे तक्रारी करुन ठेकेदार नेमण्याच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे आज हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. असा आरोप हिरामण गवळी यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com