धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महापालिकेच्या आरोग्य विभागाला नागरिकांच्या प्रश्नांशी काही घेणे नाही, तक्रार करुनही दखल घेतली जात नाही.

आरोग्य विभाग निगरगठ्ठ व गेंड्याच्या कातडीचा झाला आहे. केवळ टक्केवारीकडे या विभागाचे लक्ष आहे. असा आरोप महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला.

स्थायी समितीची सभा सभापती सुनिल बैसाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपायुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ, युवराज पाटील, विमल पाटील, संतोष खताळ, सुरेखा देवरे, कशीश उदासी, मुख्तार मन्सुरी, भारती माळी आदी उपस्थित होते.

प्रभागातील कचराचा प्रश्न कायम असून त्याची दखल घेतली जात नाही अशी तक्रार युवराज पाटील यांनी केली. नागरिकांचे प्रश्न सुटत नसल्याने सत्ताधारी बदनाम होत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शहरातील मोकाट कुत्रे, डुक्कर यांचा प्रश्न कायम असल्याचे अमोल मासुळे, भारती माळी, पुष्पा बोरसे यांनी सांगितले. परंतू हा प्रश्न सुटलेला नाही असे त्यांनी सांगितले.

सभेत मनपा मालकीच्या विविध आरक्षित जागेत विकास करण्यासाठी वास्तु विशारद, प्रकल्प सल्लागार यांनी नेमणूक करण्यासाठी निविदा दर मागविण्यात आले.

त्याबाबत आलेल्या कार्यालयीन अहवालावर फेर विचार करणे, वलवाडी सिटी सर्व्हे नंबर 73/अ जागेवर भाजी मंडई व व्यापारी संकुल विकासीत करणे आणि आरक्षित भुखंड फायनल प्लॉट नं. 153 या आरक्षित जागेवर खासगी करणातून व्यापारी संकुल विकसीत करण या विषयांना अन्सारी फातमाबी नुरुल अमीन यांनी विरोध केला.