सभापती आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ

स्वच्छतेसह इतर समस्या सोडविण्याचे काम सुरू
सभापती आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ

धुळे - प्रतिनिधी Dhule

देवपुरातील प्रभाग क्र.१ मध्ये आज सभापती आपल्या दारी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रसंगी स्थायी समिती सभापती सुनिल बैसाणे यांनी महापालिकेच्या सर्व वरीष्ठ अधिकारी, विविध विभागातील कर्मचारी आणि प्रभागाचे नगरसेवक यांच्या उपस्थितीत घरोघरी जात नागरीकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

स्वच्छतेसह इतर समस्या सोडवण्याचे काम सुध्दा सुरु करण्यात आले. सभापती बैसाणे यांनी उपक्रमाची सविस्तर माहिती देत लोकांशी संवाद साधला. या मोहितेअंतर्गत शहरातील नागरीकांच्या समस्या जागेवरच सोडविण्यात येणार आहे. यावेळी नगरसेवक नंदू सोनार, नगरसेविका वंदनाताई भामरे, नरेश चौधरी, रंगनाथ ठाकरे, नगरसेवक दगडू बागुल, भगवान देवरे, सहाय्यक आयुक्त विनायक कोते, उपायुक्त गणेश गिरी, शहर अभियंता कैलास शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com