महापालिकेतर्फे स्मशानभूमीत दोन ओटे बांधणार

महापालिकेतर्फे स्मशानभूमीत दोन ओटे बांधणार

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरानजीक असलेल्या चक्करबर्डी येथील गट नं. 205 मधील स्मशानभूमीच्या जागेत महापालिकेतर्फे दोन ओटे, नातेवाईकांना बसण्यासाठी शेड, बैठक व्यवस्था आणि विद्युत व्यवस्था करण्यात येणार आहे. या कामाची पाहणी आयुक्त अजीज शेख यांनी दिली.

सुमारे वर्षभरापासून क रोनाच्या संकट काळात कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी चक्करबर्डी येथील मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या गट नं. 205 येथे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल यांनी स्वमालकीची जागा सामाजिक बांधिलकी म्हणून उपलब्ध करुन दिली.

वर्षभराच्या काळात धुळे शहरासह ग्रामीण भाग, जळगाव, नंदुरबार, मालेगाव आदी जिल्ह्यातील सुमारे 600 ते 750 करोना बाधीत मयतांवर अंत्यसंस्कार त्या ठिकाणी करण्यात आले.

सदर मयतांवर अंत्यविधी सोपस्कार महापालिकेच्या कर्मचार्‍यांतर्फे विनामुल्य केले जात आहे. त्या ठिकाणी महापालिकेतर्फे लाकूड, गोवरी, पीपीई किट इत्यादी साहित्य विनामुल्य महापालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

सद्य:स्थितीत कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीबद्दल नातेवाईकांना असलेली भिती कमी झाल्याने नातेवाईक अंत्यसंस्काराला पुढे येवू लागले आहेत.

त्यामुळे स्मशानभूमीत नातेवाईकांना ताटकळत राहू नये व गैरसोय होवू नये यासाठी महापालिकेतर्फे तेथे दोन ओटे, नातेवाईकांना बसण्यासाठी शेड, बैठक व विद्युत व्यवस्था करण्यात येत आहे.

या कामाची पाहणी आज आयुक्त अजीज शेख यांनी केली. यावेळी सदरर जागेचे सपाटीकरण करुन पाण्याची व्यवस्था करावी तसेच स्वच्छता ठेवावी. सदर काम आठ दिवसात पुर्ण करावे, अशी सूचना आयुक्त शेख यांनी दिली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल, नगररचनाकार महेंद्र परदेशी, सहाय्यक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील, प्रदीप चव्हाण आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com