धुळे : ‘मनसे’ ने आणला मनपात 'बळी'चा बकरा
धुळे

धुळे : ‘मनसे’ ने आणला मनपात 'बळी'चा बकरा

Rajendra Patil

धुळे । प्रतिनिधी

मनपाच्या हलगर्जीपणामुळेच धुळ्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. धुळेकर बळीचा बकरा बनत असल्याचे सांगत चक्क गळ्यात पाटी अडकवून बकराच मनपात आणला.

तर कसाईच्या प्रतिकात्मक रुपात आयुक्तांना दाखवून त्यांच्या हातात करोनारुपी तलवार देण्यात आली. मनसेच्या या आंदोलनाने साऱ्यांचे लक्ष वेधले.

यावेळी ॲड दुष्यतराजे देशमुख, अजित राजपूत, संदीप जडे, संजय सोनवणे,संतोष मिस्तरी, राजेश दुसाने, दीपक बच्छाव आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com