दहा लाखांचा गुटखा जप्त

धुळे तालुका पोलिसांची कारवाई
दहा लाखांचा गुटखा जप्त

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

तालुक्यातील मौज मोरदडतांडा गावात छापा टाकत एका गाळ्यातून तब्बल...

10 लाख 50 हजार 896 रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई काल दुपारी तालुका पोलिसांनी केली. याप्रकरणी तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजे मोरडतांडा गावात रेल्वे क्रॉसींग ते तरवाडे गावाकडे जाणार्‍या रस्त्यालगत असलेल्या गाळयात अवैधपणे प्रतिबंधक गुटख्याचासाठा करुन ठेवला असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काल दि. 3 रोजी तेथे छापा टाकला. दिलीप वसंत जगताप (वय 24, रा.लेंडाने, ता. मालेगाव व ह.मु मोरदडतांडा, ता धुळे) यांच्या ताब्यातील गाळ्याची तपासणी केली असता त्यात तंबाखुजन्य माल मिळुन आला.

त्यात 7 लाख 40 हजार 520 रूपये किंमतीचे एकुण 17 खाकी रंगाच्या गोणीचे विमल पान मसाला नावाचा अवैध गुटखा, 2 लाख 33 हजार 376 रूपये किंमतीचे एकुण 6 खाकी रंगाच्या गोणीचे विमल पान मसाला नावाचा गुटखा, 57,200व 19 हजार 800 रूपये किंमतीचा व्ही-1 टोबॅको नावाचा तंबाखुजन्य गुटखा असा एकुण 10 लाख 50 हजार 896 रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे तसेच पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई कैलास चौधरी, पोहेकॉ राजु मोरे, जितेंद्र सोनार, पोना प्रविण पाटील, चेतन चव्हाण, प्रकाश भावसार, पोकॉ. धिरज सांगळे, राकेश शिरसाठ, राकेश महाले, दिलीप महाले यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com