धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरासह जिल्ह्यात करोनाची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे साखळी खंडीत व्हावी म्हणून जिल्ह्यातील नागरी व ग्र्रामीण क्षेत्रात दि. 27 ते 30 मार्च दरम्यान लॉकडाऊन करण्यात आले आहे.

या कालावधीत आरोग्य सेवा, दुध केंद्र, औषधांचे दुकाने सुरु राहतील व इतर आस्थापना बंद राहतील. अशी माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

दि. 27 मार्च रोजी रात्री 8 वाजेपासून 30 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे दि. 28 रोजी होळी व 29 रोजी धुलिवंदन साजरा करता येणार नाही.

तसेच लॉकडाऊनमध्ये आरोग्य सेवा, दुध केंद्र, औषधांचे दुकाने सुरु राहतील. तर किराणा दुकान, हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे, भाजी, फळे विक्री व इतर आस्थापना बंद राहतील. असे श्री. यादव यांनी सांगितले.