महिला व बालविकास अधिकार्‍यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

महिला व बालविकास अधिकार्‍यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महिला वसतीगृहाला पुरविलेल्या अन्नधान्य पुरवठ्याची बिले मंजूर करण्यासाठी चार लाखांची मागणी करून पहिला हप्ता एक लाखाची लाच टेबलवर ठेवण्यास सांगून स्विकारणार्‍या रायगड जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकार्‍यासह कंत्राटी लेखापालला रंगेहाथ पकडले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराच्या सृष्टी एंटरप्राइजच्या वतीने सरकारी कृपा महिला वसतिगृह, कर्जत व शासकीय कृष्ठरोगी भिक्षेकरी गृह, कोलाड येथे पुरविलेल्या अन्न धान्य पुरवठयाची बिले मंजूर करण्यासाठी रायगड जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उज्वला सदाशिवराव पाटील, (वय 47) यांनी 4 लाख 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

त्यामुळे तक्रारदाराने रायगड एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने आज सापळा कारवाई केली.

पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये हे उज्वला पाटील यांनी टेबलवर ठेवण्यास सांगून स्वीकारले. तर कंत्राटी लेखापाल भूषण रामचंद्र घारे यांच्याकडे ती रक्कम मिळून आली.

त्यावरून वरील दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रायगड एसीबीचे पोलिस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोरे, शिर्के, महेश पाटील, पोना मगर, सूरज पाटील यांच्या पथकाने केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com