कडईपाणी गावात दंगल

कडईपाणी गावात दंगल

8 जखमी, 16 जणांवर गुन्हा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिरपूर तालुक्यातील कडईपाणी गावात सोमवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. त्यात 8 जण जखमी झाले.

याप्रकरणी परस्पविरोधी विरोधी तक्रारीवरून 16 जणांवर शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हरीराम रजान पावरा (वय 35 रा. कडईपाणी) यांच्या फिर्यादीनुसार दि. 26 रोजी सायंकाळी सरकारी पाणीच्या टाकीचा पाईप का फोडला, असे विचारले.

त्याचा राग येवून हरीराम यांच्यासह चौघांना दयाराम अनसिंग पावरा, सयाराम उर्फ पुट्टन अनसिंग पावरा, नुरसिंग सखल्या पावरा, मन्साराम मुनसिंग पावरा, सुरेश नुरसिंग पावरा, भावसिंग नानला पावरा व पठाण नुरसिंग पावरा यांनी शिवीगाळ करत हाताबुक्यांंनी मारहाण केली.

त्यात हरिराम, बसंतीबाई हरीलाल पावरा, थावलीबाई रामलाल पावरा व उमेश रजान पावरा जखमी झाले. त्यावरून सात जणांवर गुन्हा दाखल झाला.

तर दयाराम अनसिंग पावरा यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, सरकारी पाणीच्या टाकीचा व्हॉल का बंद केला, असे विचारले.

त्याचे वाईट वाटून हरीराम रजान पावरा यांच्यासह नऊ जणांनी दयारामसह सयाराम पावरा, नुरसिंग पावरा, शिरूबाई भायसिंग पावरा यांना शिवीगाळ करत हाताबुक्यांनी मारहाण केली.

तसेच लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यावरून हरीरामसह अनिल सुदर्‍या पावरा, सुदर्‍या वेलू पावरा, सुनील सुदर्‍या पावरा, देविलाल राजाराम पावरा, पिक्या राजाराम पावरा, मोठा सोमाराम पावरा, बबलू श्रीराम पावरा व जगल्या रामलाल पावरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com