साडे पाच लाखांचा अपहार, कनिष्ठ सहाय्यकावर गुन्हा
श्रीगोंदा जमीन घोटाळा

साडे पाच लाखांचा अपहार, कनिष्ठ सहाय्यकावर गुन्हा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात साडे पाच लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कनिष्ठ सहाय्यकावर नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज वाडेकर यांनी नरडाणा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक प्रितम साहेबराव देसले (वय 42) याने जुलै ते नोव्हेंबर 2020 दरम्यान आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांचे शासकीय व खाजगी कपातीच्या खात्याचे कोरे धनादेश पदाचा गैरवापर करून एकाच्या खात्यावर वटविले.

यासाठी त्या खातेधारक संशीयीत आरोपीशी संगणमत केले.

डॉ. वाडेकर यांच्या स्वाक्षर्‍या घेवून धनादेश संबंधीत खात्यावर न वटविता/भरणा न करता परस्पर खाजगी इसमाच्या खात्यावर बेकायदेशीररित्या वटवून एकुण 5 लाख 42 हजार रूपयांचा अपहार केला.

येवढ्यारच न थांबता देसले याने संबंधीत व्यवहारांशी संबंधीत सर्व दस्तऐवज पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने सोबत घेवून गेला.

त्यावरून प्रितम देसले याच्याविरोधात नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शरद पाटील हे तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com