अवैध सावकारी, वाहनावर बनावट नंबर टाकून फसवणूक

दोघांवर गुन्हा
अवैध सावकारी, वाहनावर बनावट नंबर टाकून फसवणूक

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

अवैध सावकारीसह वाहनावर बनावट नंबर टाकून शासनाची फसवूणक केल्याप्रकरणी शहरातील दोघांवर पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबात स्थानिक गुन्हे शाखेचे पोकाँ सागर शिर्के यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कल्याण गरूड उर्फ हेमंत मांगुलाल गरूड (रा. रूपम अपार्टमेंट, परिमल कॉलनी, वाडीभोकर रोड, देवपूर) याने सावकारीचा कोणताही परवाना नसतांना आर्थिक अडचणीतील लोकांकडून त्यांची वाहने ताब्यात घेवून त्यांना ठरावीक रक्कम देवून त्या रक्कमेवर व्याजाची आकारणी केली.

तसेच आरटीओ रजिस्टेशन नंबर नसलेल्या वाहनांवर बनावट नंबर टाकून शासनाची फसवणूक केली.

तर भुषण राजेंद्र सुर्वे (रा. केरोजी नगर, शासकीय दुध डेअरी मागे, यशवंत नगर, धुळे) याने दुचाकी आपल्या नावे नसतांना ती आपली असल्याचे भासवून कल्याण गरूड यांच्याकडे 40 हजार रूपयात गहाण ठेवली.

त्यानुसार दोघांवर भांदवि कलम 420 सह महाराष्ट्र सावकारी अधि. सन 2014चे कलम 39 प्रमाणे पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सैय्यद करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com