मेहेरगाव खून प्रकरणाचा उलगडा, संशयिताला अटक

मेहेरगाव खून प्रकरणाचा उलगडा, संशयिताला अटक

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

पार्टीच्या बहाण्याने शेतात बोलवून डोक्यावर आणि शरीरावर शस्त्राने वार करुन मेहेरगाव, ता. धुळे येथे तरुणाचा खून केल्याचा उलगडा पोलिसांनी केला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

मेहेरगाव येथील विजय विक्रम देसले व चंद्रभान विक्रम देसले यांच्या शेतातून वहिवाटीचा रस्ता नसतांनाही प्रवीण शरद भामरे याने शेतातून वहिवाटाचा रस्ता द्यावा असा तगादा लावला. मात्र देसले बंधूंनी याला दाद दिली नाही.

म्हणून प्रवीणने विजयला पार्टीच्या बहाण्याने शेतात बोलविले व वहिवाटीचा रस्ताबाबत पुन्हा विचारले. त्यावेळी प्रवीणने विजयच्या डोक्यावर तसेच शरीरावर शस्त्राने वार केला.

यात त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्याच शेतात असलेल्या विहिरीत मृतदेह फेकून दिला.

विजय बेपत्ता झाल्याबाबत तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती. सपोनि प्रकाश पाटील यांनी तपास सुरु केला.

त्यावेळी वहिवाट रस्त्याबाबत वाद असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे प्रवीणवर संशय घेण्यात आला. याबाबत भादंवि 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी धुळ्यातील नगावबारी परिसरातून प्रवीण भामरेला अटक केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com