भाडणेत गोडावूनमधून घरगुती 143 सिलेंडर लंपास

भाडणेत गोडावूनमधून घरगुती 143 सिलेंडर लंपास

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

साक्री तालुक्यातील भाडणे शिवारातील गॅस गोडावून फोडून चोरट्यांनी तब्बल 143 गॅस सिलींडर लंपास केले. त्याची किंमत 1 लाख 17 हजार रूपये आहे. याप्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अंजना पोपट पवार (वय 40 रा. प्लॉट क्र. 45, नागाई कॉलनी, साक्री) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचे भाडणे शिवारात किशोर शिवराम भदाणे यांच्या मालकीच्या जागेत इंन्डेन गॅस कंपनीचे गोडावून आहे.

चोरट्यांनी दि. 19 रोजी सायंकाळी साडेसहा ते दि. 20 रोजी सकाळी नऊ वाजेदरम्यान गोडावूनच्या लोखंडी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

एकुण 143 सिलींडर चोरून नेले. त्याची किंमत 1 लाख 17 हजार 832 रूपये इतकी आहे. त्यानुसार साक्री पोलिसात फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक आर.व्ही.निकम करीत आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com