चाईल्ड पोर्नोग्राफी शेअर करणार्‍यां तिघांवर गुन्हा

चाईल्ड पोर्नोग्राफी शेअर करणार्‍यां तिघांवर गुन्हा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

सोशल मिडीयावर चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधीत व्हीडीओ प्रसारीत करणार्‍या तिघा फेसबुक व इंस्टाग्राम खाते धारकांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.

सायबर पोलिस ठाण्याचे पोकाँ विवेक बिलाडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार अली शेख, कल्पेश जाधव व शालीग्राम सोनवणे या युजर नेम असणार्‍या फेसबुक व इन्स्टाग्राम खाते धारकांनी दि. 26 मे 2020 ते दि. 22 जुन 2020 दरम्यान त्यांच्या फेसबुक व इंस्टाग्राम खात्याव्दारे चाईल्ड पोर्नोग्रॉफी संबंधीत व्हीडीओ इलेक्ट्रॉनीक माध्यमाव्दारे प्रेषित केले.

म्हणून तिघा खाते धारकांवर सायबर पोलिसात माहिती तंत्रज्ञान कायदा 2020 चे कलम 67 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतिश गोराडे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com