लळींग गावातून दहा पेटीपॅक एसी जप्त

मोहाडी पोलिसांची कारवाई
लळींग गावातून दहा पेटीपॅक एसी जप्त

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग गावात छापा टाकत मोहाडी पोलिसांनी एका पत्र्यांच्या खोलीतून 10 पेटीपॅक एसी जप्त केले. त्यांची किंमत पाच लाख रूपये आहे.

आज सकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लळींग (ता. धुळे) गावात एका पत्र्याच्या खोलीत चोरीचे एसी ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मोहाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा, पोकाँ तुषार जाधव, अजय दाभाडे, प्रविण पाटील, विकास शिरसाठ यांच्या पथकाने सकाळी 11 वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकला.

मात्र ती खोली बंद दिसून आली. विचारपुस केली असता ती खोली हनुमान धर्मा गवळी यांची असल्याचे समजले. त्यांना बोलावून कुलूप उघडण्यात आले. खोलीत वोल्टास कंपनीचे नवीन दहा एसी आढळून आले. त्यांची किंमत 5 लाख रूपये आहे.

मालाबाबत विचारणा केली असता गवळी यांनी हा माल मनोज अभिमन बळसाणे यांनी उतरविला असल्याचे सांगितले.

दोघांना बिलाबाबत विचारले असता समाधानकारण उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी एसी जप्त केले.

याप्रकरणी पोकाँ अजय दाभाडे यांच्या तक्रारीवरून हनुमान गवळी (रा. लळींग) याच्यावर अदखपात्र गुन्हा दाखल झाला आहे. पुढील चौकशी पोलिस करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com