तरुणाचा गळा आवळून खून, महिलेला अटक
Crime news

तरुणाचा गळा आवळून खून, महिलेला अटक

कमखेडा शिवारातील घटना

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिंदखेडा तालुक्यातील कमखेडा शिवारात तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

याप्रकरणी नंदुरबार येथील महिलेसह तिच्या साथीदारांवर नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काल सायंकाळीच महिलेला अटक केली आहे.

याबाबत भारतीबाई प्रकाश कोळी (रा. शिवाजी चौक, पोस्ट ऑफिस गल्ली, खेतीया ता. पानसेमल जि. बडवानी, मध्यप्रदेश) यांनी नरडाणा पोलिसात दिलेल्या फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, त्यांचा मुलगा विलास उर्फ विशाल प्रकाश कोळी (वय 22 ) याचा रेशमा उर्फ लक्ष्मी ज्ञानदेव काशीकर (वय 25 ते 30 रा. कंजरवाडा, नंदुरबार) या महिलेसह तिच्या इतर साथीदारांनी अज्ञात कारणावरून कुठल्यातरी वस्तूने गळा आवळून खून केला.

दि. 11 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विलास हा कमखेडा गाव शिवारातील संजय नारायण शिंदे यांच्या शेताच्या बांधावर रोडलगत मृतावस्थेत आढळून आला. त्यांच्यावर मुळ गावी खेतिया येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यानंतर काल दि. 13 रोजी भारतीबाई यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून महिलेसह तिच्या साथीदारांवर भादंवि कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय मनोज ठाकरे करीत आहेत.

दरम्यान पोलिसांनी काल सायंकाळीच रेशमा काशीकर या महिलेला ताब्यात घेत अटक केली. इतर संशयीतांचाही कसुन शोध सुरू आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com