धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील चाळीसगाव रोड पोलिसांनी वडजाई रोडवरील इसाक मशीदजवळ एका पत्र्याच्या गोडावूनमधील अवैध कत्तलखान्यावर काल रात्री छापा टाकत कारवाई केली.

एकुण 3 हजार 400 किलो मांस व साहित्य असा 5 लाख 25 हजार 300 रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान अंधारात तीन जण फरार झाले. त्यांच्याविरोधात चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

वडजाई रोडवरील इसाक मशीदजवळ एका पत्र्याचे गोडाऊनमध्ये नदिम बेला हा त्याचे साथीदारांसह जनावरांची अवैधरित्या कत्तल करुन त्यांचे मांस विक्री करण्याचे उद्देशाने घेवुन जावुन विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती सपोनि संदीप पाटील यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्यासह पथकाने दि. 30 मार्च रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकला. तेव्हा पत्र्याच्या गोडाऊनमध्ये जनावरांची अवैधरित्या कतल करण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहुन नदीम उर्फ नदीम बेला (रा. वडजाई रोड, फिरदोस नगर, धुळे) व जुन्नेद कुरेशी (रा.कबीर गंज, धुळे), मुजाहीद हजी (रा. मिल्लत नगर, धुळे) हे अंधारात पसार झाले.

घटनास्थळाहून 5 लााख 10 हजार रुपये किंमतीचे 3 हजार 400 किलो जनावरांचे मांस व कत्तलीसाठी वापरण्यात येणारे हत्यारे, वजनकाटा, पाण्याचे ड्रम असा एकुण 5 लाख 25 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चेतन झोळेकर यांच्या फिर्यादीवरुन वरील इसमाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळेे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप पाटील, पोसई योगेश राऊत, पोसई योगेश ढिकले, हवालदार अजिज शेख, किरण राजपुत, पोना प्रदिप पाटील, भुरा पाटील, पोकाँ प्रेमराज पाटील, हेमंत पवार, संदीप वाघ, सुशिल शेंडे, चेतन गोळेकर, स्वप्नील सोनवणे, सोमनाथ धीरे, मुकेश पावरा यांच्या पथकाने ही कारवाई केली.