धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील येस बँकेत कामाच्या ठिकाणी होत असलेल्या त्रासाला कंटाळून तरूण कर्मचार्याने गळफास घेत आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांविरूध्द देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत जितेंद्र जिजाबराव पवार (वय 27 रा.शिवाजी नगर, नगावबारी, देवपुर, धुळे व ह.मु.सी.बी.डी बेलापुर,नवी मुंबई) याने देवपुर पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार त्याचा भाऊ प्रशांत पवार (वय 30 रा.शिवाजी नगर) हा शहरातील येस बँकेत नोकरीला होता. त्यादरम्यान या कामाच्या ठिकाणी त्याला दीपक पाटील, प्रमोद हिंगणे आणि मोहित पवार (पुर्ण नाव गाव माहित नाही) यांनी सन 2020 पासून त्रास देण्यास सुरूवात केली.

तसेच त्यांची बदनामी केली. त्रासाला आणि केलेल्या बदनामीमुळे प्रशांत याने दि. 2 फेब्रुवारी रोजी गळफास घेवून आत्महत्त्या केली.

याबाबत प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर दि.12 मार्च रोजी प्रशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वरील तिघांवर देवपुर पोलिसात भादंवि कलम 306,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास तपास पीएसआय लोकेश पवार करीत आहेत.