बांधकाम व्यावसायिकांसह दोघांची १ कोटीत फसवणूक

11 जणांवर गुन्हा
बांधकाम व्यावसायिकांसह दोघांची १ कोटीत फसवणूक

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील बांधकाम व्यावसायीक पराग अहिरेसह त्यांचे भागिदार राजेंद्र भामरे यांची तब्बल एक कोटी रूपयात फसवणुक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

देवपूरातील नकाणे रोडवरील श्रध्दा नगरात राहणारे पराग सुभाष अहिरे (वय 44) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सौरभ सुनिल काकडेंसह अकरा जणांनी पराग अहिरे आणि त्यांचे भागिदार राजेंद्र यशवंत भामरे यांच्याशी रावेर (ता.धुळे) येथील गट नं.11/7 येथील शाळेच्या बांधकामाचा करार केला.हा करार पुर्ण केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होईल, असे प्रबोधन दाखविले.

संशयीत आरोपींच्या सांगण्यावरुन अहिरे यांनी वेळोवेळी वैयक्तीक रित्या खर्च केला. संशयीत आरोपींनी जाणीवपुर्वक कट कारस्थान रचून खोटे आणि बनावट दस्ताऐवज तयार केले.

अहिरेसह दोघांनी खर्च केलेले एक कोटी 14 लाख 62 हजार 750 रुपये एवढी रक्कम त्यांना परत न देता दि. 25 ऑगस्ट 2020 रोजी 17 कोटी 50 लाख रुपये किंमतीचा न वटणारा धनादेश देवून फसवणूक केली. हा प्रकार दि. 2 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2020 दरम्यान घडला.

याप्रकरणी सौरभ सुनिल काकडे ,मिथिलेश हरिष कनोजीया, सईफ आलीम आगा, अर्चना उमेश काळे, सलीम शेख, सनी नानासाहेब वाघचौरे, संजय गुजर उर्फ बंटी, प्रिती सोनी, दिनेश अर्जून कांबळे सर्व (रा.ललवाणी प्लाझा, विमान नगर, पुणे), अनामीका देवरे (रा.उमराने सौंदाणे, ता.मालेगाव), दुर्गेश पवार (रा.सुरत, गुजरात) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय आर.एस.काळे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com