धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात शनिवारी नव्याने 193 करोना रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 16 हजार 693 वर पोहचली आहे.

जिल्हा रुग्णालय येथील 108, भाडणे साक्री सीसीसी रॅपीड अँटीजन टेस्टमधील चार, महापालिका रॅपीड अँटीजन टेस्टमधील तीन, महापालिका सीसीसीमधील 16, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 13, एसीपीएममधील तीन, खासगी लॅबमधील 30 असे एकूण 193 बाधीत शनिवारी आढळून आले आहेत.

धुळ्यातील कृषी कॉलेजात सहा रुग्ण

धुळे शहरातील कृषी कॉलेजमध्ये सहा तर अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरिअल मेडिकल कॉलेजमध्ये एक बाधीत आढळून आला आहे.