धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरात काल सायंकाळी दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यात ब्लेड, चाकु व तलवारीचा सर्रास वापर करण्यात आला.

त्यात दोन ते तीन जण जखमी झाले असून परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन विद्यमान नगरसेवकांसह दहा ते बारा जणांविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शहरातील महापालिकेनजीक क्षुल्लक कारणावरून दोन गट भिडले. त्यात एका गटाकडून तरूणावर ब्लेड व चाकुने वार करत हाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली.

याबाबत दोन विद्यमान नगरसेवकांसह सहा ते सात जणांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. तर दुसर्या गटाकडूनही एकाला शिवीगाळ, दमदाटी करीत तलवारीने हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.