धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील मालेगाव रोडवरील रामवाडीत जागेच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

त्यात चौघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी चार जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत वाल्मीक काशिनाथ गुळदगडे (वय 35 रा. तिखी ता. धुळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काल दि. 19 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांना तुमच्या व साक्षीदार यांंच्या मालकीच्या प्लॉटमध्ये काही इसम घर पाडत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसाार त्यांच्यासह चौघे रामवाडी येथे पोहोचले. तेव्हा परशुराम रघुवीर परदेशी यांच्यासह चौघांनी तुमचा सदर जागेशी संबंध नाही, असे बोलून शफिक याने सचिन गुळदगडे यांच्यावर चाकुने वार केले.

तर परशुराम याने वाल्मीक गुळदगडे यांच्या पायावर तर युसुफ याने काशिनाथ गुळदगडे यांच्या पायावर लोखंडी टॉमीने मारहाण करून जखमी केले. तसेच कल्पना परशुराम परदेशी हिने सुमनबाई काशिनाथ गुळदगडे यांना मारहाण करून डोके जमिनीवर आपटून जखमी केले.

त्यावरून परशुराम परदेशी, कल्पना परदेशी (रा. पश्चिम हुडको, चाळीसगाव रोड, धुळे) व शफिक, युसुफ (पुर्ण नाव गाव माहित नाही) याच्याविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परशुराम परदेशी याला ताब्यात घेतले आहे. तपास उपनिरीक्षक समाधान गायकवाड हे करीत आहेत.