धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरानजीक असलेल्या मोहाडी उपनगरातील रिलायन्स टॉवर जवळून चोरुन नेण्यात आलेली पिकअप व्हॅनसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांनी नशा करण्याच्या खर्चासाठी सदर वाहन चोरुन नेल्याचे पोलिसांना सांगितले.

शहरानजीक असलेल्या मोहाडी उपनगरातील रिलायन्स टॉवर जवळील लोहार कॉम्प्लेक्स येथील दुकानासमोर एमएच 18 एए 4775 क्रमांकाची फारुख हाजी लतिफ मेमन यांच्या मालकीची गाडी लावलेली होती.

सदर वाहन चोरुन नेल्याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. सपोनि योगेश राजगुरु यांना 3 जानेवारीला काटेर झुडपात आसिफ शेख मोहम्मद हनीफ हा त्याच्या साथीदारासोबत नशा करत असतांना त्याच्याजवळ पिकअप गाडी असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार मोहाडी पोलिसांनी पथक तयार केले. पोलिसांनी आसिफ व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.