धुळे - Dhule - प्रतिनिधी :

देवपूर पोलिसांची दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 1 लाख 75 हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

देवपूरातील स्वामी नारायण मंदिराबाहेरून सोपान भिला मोरे (रा. धमाणे ता. धुळे) यांची दुचाकी चोरीस गेली होती. याबाबत देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपासादरम्यान सपोनि चंद्रकांत पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवत एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने स्वामी नारायण मंदिरा बाहेरून व शहरातील इतर ठिकाणाहून दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून 1 लाख 75 हजार रूपये किंमतीच्या चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

ही कामगिरी पोलिस निरीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पाटील, उपनिरीक्षक लोकेश पवार, पोहेकाँ जब्बार शेख, पोना शशिकांत देवरे, पोकाँ मुकेश वाघ, किरणकुमार साबळे, विनोद अखडमल, सागर सुर्यवंशी, निखिल काटकर यांनी केली आहे.