धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जीवंत व्यक्तीला मयत दाखवून ट्रस्टची मिळकत हडप करण्यासाठी वक्फ बोर्डाच्या नावाने बनावट दस्तऐजव तयार करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन जणांवर आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मोलवीवाडी मशिद ट्रस्टी नियाज अहमदयार मोहम्मद मौलवी (वय 75 रा. अकबर चौक, मौलवीवाड, धुळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार एकबाल अमद याद मोहम्मद रज्जाक (रा. कसाबवाडा मशिद जवळ, धुळे) व रईस शाह साबीर शाह या दोघांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नियाज अहमदयाद मोहम्मद मौलवी हे जिवंत असून देखील त्यांना मयत दाखविले.

ट्रस्टीची मिळकत हडप करण्याच्या उद्देशाने दोघांनी कटकारस्थान रचून खोटे प्रतिज्ञा पत्र सादर करून स्वतःला ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून वफ बोर्डाच्या नावाचे बनावट दस्तऐवज तयार करून घेवून फसवणूक केली.

त्यावरून वरील दोघांविरोधात भांदवि कलम 420, 467, 468, 471, 772, 120 (ब), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक बी.आर.पाटील करीत आहेत.