धुळे - Dhule - प्रतिनिधी :

आक्षेपार्ह फोटो काढून त्याव्दारे ब्लॅकमेल करत तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिसात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत साक्री तालुक्यातील टेंभे येथे राहणार्या पिडीत 20 वर्षीय तरूणीने निजामपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पिडीत तरूणीची प्रकृती बरी नसतांना तिला दिनेश लहानु सरक (रा. महिर) याने उपचार करण्याच्या बहाण्याने सलाईनने काहीतरी गुंगी सारखे औषध देवून तिला बेशुध्द केले.

तिचे मोबाईलमध्ये आक्षेपार्ह फोटो काढून नंतर तिला फोन करून तु मला भेटायला ये त्यानंतर ते फोटो डिटील करतो, असे तिला त्याने सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या पिडीत तरूणी कुणाला काही न सांगता त्याला भेटण्यासाठी साक्री बसस्थानकावर गेली.

तेथून दिनेश त्याने तरूणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून साक्रीतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेवून तेथील दुसर्या मजल्यावरील खोलीत नेले. तेव्हा पिडीत तरूणीने त्याला माझे फोटो आता डिलीट कर, असे सांगितले.

त्यानंतर दिनेश याने तरूणीवर जबरदस्तीने अत्याचार केले. पुन्हा तिच्या सोबत जबरदस्तीने आक्षेपार्ह फोटो काढले. याबाबत कोणाला काही सांगितले तर तुझे फोटो व्हॉट्सअॅप डिपी म्हणून ठेवले, अशी धमकीही तिला दिली.

त्यानंतरही दिनेश याने तिला वेळोवेळी बोलावून तिच्यावर अत्याचार केले. तुझ्या होणार्या पतीला तुझे आक्षेपार्ह फोटो पाठवून तुझा साखरपुडा होवू देणार नाही, अशी धमकीही तिला दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार दि. 26 मार्च 2020 ते 13 डिसेंबर 2020 दरम्यान घडला.

त्यानुसार निजामपूर पोलिसात दिनेश लहानु सरक याच्याविरोधात भांदवि कलम 376, 31, 328 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक एम.एच. जेजोट करीत आहेत.