धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिरपूर तालुक्यातील उपरपिंड शिवारात तापी नदी पात्रातील सुलवाडे बॅरेज गेट क्र. 25 जवळ गोणपाटात बांधलेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत शिरपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमारे 35 वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह गोणपाटात बांधलेला आढळून आला. मृतदेह पाण्याच्यावरती येवू नये म्हणून गोणपाटात दगडही टाकण्यात आलेले होते.

सदर महिलेची ओळख पटलेली नसून तिची हत्त्या का करण्यात आली याचे कारण समजू शकले नाही. याबाबत अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.