धुळ्यात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी
धुळे

धुळ्यात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे | दि.२९, (प्रतिनिधी) –

शहराच्या आमदारांच्या घरासमोर एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून अपशब्द वापरल्यामुळे दोन गटात वाद झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत काठ्या, लोखंडी पाईप, गुप्तीचा वापर करण्यात आला. या हाणामारीत एक जण गंभीर जखमीझाला आहे. तारीक महम्मद हानीफ (वय २५ रा. इशाक मशीद जवळ, धुळे) असे जखमीचे नाव आहे.

आमदारांच्या घरासमोर एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून दोन गटात वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. हाणामारीत लाकडी काठ्या, लोखंडी पाईप आणि गुप्तीचा वापर करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच. घटनास्थळी फौजफाटा दाखल झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. या हाणामारीत जखमी झालेला तारीक याला सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com