धुळे - Dhule - प्रतिनिधी :

मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव रोड चौफुली पुढे असलेल्या अन्वर नाला परिसरात आज सकाळी एक इसम रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला दिसून आला.

त्याचा खून झाल्याचे दिसून येत असून पोलिसांनी त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.

रात्री उशिरा हा इसम बेटावद येथील असल्याचा अंदाज असून सबंधीतांना ओळखपटविण्यास बोलविण्यात आले असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सपोनि विलास ठाकरे यांनी देशदूतशी बोलतांना दिली. दरम्यान घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी प्रदीप पाडवी यांच्यासह चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सपोनि विलास ठाकरे, मोहाडी पोलिस ठाण्याचे योगेश राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

मृत इसमाच्या डोक्यावर, डोळ्यावर, पायाला गंभीर स्वरुपाच्या जखमा असून रक्तस्त्राव झाल्याच दिसून आले.

त्यामुळे प्रथमदर्शी हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या पाहणीत स्पष्ट झाले. श्वानने काही अंतरापर्यंत माग काढला, नंतर मात्र तेथेच घुटमळत होता. पोलिसांनी पंचनाम करीत इसमाचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविला.

त्यानंतर मृताची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. तपासादरम्यान मयत इसम हा बेटावद (ता. शिंदखेडा) येथील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांनाही ओळख पटविण्यासाठी बोलविण्यात आले आहे. त्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरणार आहे.याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.