धुळे - Dhule - प्रतिनिधी :

ट्रकमधून गुरांची निदर्यपणे होणारी वाहतूक शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली.ट्रकमधील 43 गोर्हांची सुटका करण्यात आली.

तर दोन गोर्हे मृतावस्थेत आढळून आले. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात अज्ञात व्यतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड चेक पोस्टवर काल दि. 15 रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास शिरपूर तालुका पोलिसांनी गुरांची वाहतूक करणार्या ट्रकला (क्र.आरजे 09 जीसी 1626) पकडले.

अंधाराचा फायदा घेत चालक ट्रक सोडून पसार झाला. ट्रकची तपासणी केली असता त्यात 45 गोर्हांना दाटीवाटीने निदर्यपणे बांधलेले आढळून आले.

त्यात दोन गोर्हे मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी 15 लाख रूपये किंमतीचा ट्रक व 2 लाख 70 हजार रूपये किंमतीचे गोर्हे असा एकुण 17 लाख 70 हजारांचा मुद्येमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोना संजीव जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.