धुळे - Dhule - प्रतिनिधी :

दारूच्या नशेत बडबड करीत असल्याचा राग मनात धरून मोठ्या भावानेच लाकडी दांडक्याने मारहाण करून लहान भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

विश्वास झिपरू अहिरे (वय 52 रा. गुंजाळ ता. साक्री) असे मयताचे नाव आहे. तो दारूच्या नशेत बडबड करीत असे.

याचा राग मनात धरून त्याचा मोठा भाऊ येडु झिपरू अहिरे याने दि. 2 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास लाकडी दांडक्याने विश्वास यास पोटावर, पाठीवर, छातीवर बेदम मारहाण केली.

त्यामुळे पोटा अंतर्गत रक्तश्राव होवून विश्वास अहिरे यांचा मृत्यू झाला. अशी फिर्याद शेंगीबाई विश्वास अहिरे (वय 48) यांनी पिंपळनेर पोलिसात दिली आहे.

त्यानुसार येड अहिरे याच्याविरोधात भांदविक कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर करीत आहेत.